शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद संपला

Foto
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या खटल्याची आजचीन  सुनावणी संपली आहे, उद्धव ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सलग सातव्या दिवशी युक्तिवादा केला. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केला, असा दावा केला.  विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या असतो. तसेच आमदार आपल्याकडे आहेत म्हणून आम्हीच पक्ष  आहोत, असा शिंदे गटाकडून करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

आज युक्तिवादाला सुरुवात करताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राहुल नार्वेकर यांनी अधिकारांच्या चौकटीबाहेर जाऊन शिवसेना हा राजकीय पक्ष कुणाचायाबाबतचा निर्णय दिला. तसेच आपल्याकडे अधिक आमदार असल्याने पक्ष आपलाच असा दावा करणाऱ्या शिंदे गटाचा दावा तकलादू असल्याचेही सिब्बल यांनी सांगितले. आमदारांचा एखादा वेगळा गट तयार झाला तर तो दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो, असा गट आपणच खरा पक्ष असा दावा करू शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

यावेळी विधिमंडळ पक्षाची कालमर्यादाही कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केली. विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आमदारांच्या निवडून आलेल्या कार्यकाळापुरतं विधिमंडळ पक्षाचं अस्तित्व असतं. मात्र आमदार असो वा नसो राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. तसेच दहाव्या सूचीनुसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो. राजकीय पक्ष हा पूर्णणपे वेगळा असतो. राजकीय पक्षाचं नेतृत्व कुणाकडे आहे,  याचीही नोंद निवडणूक आयोगाकडे असते, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

याबरोबरच शिंदेगटाने शिवसेनेवर केलेला दावा म्हणजे सरकारच्या जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकामासारखा आहे. काही दिवस राहायचं आणि मग ही जागा आमची असे म्हण्यासारखा आहे, असा युक्तिवादही सिब्बल यांनी केला.